Facebook Badge

Wednesday, April 19, 2017

A Scar..

She have a scar on her face.

Did she have an accident as a child?
or, was she abused by someone close to her?
Was there a fire that made its presence felt forever on that glowing face?
or was it just depression that made her do it to herself?

She is wearing that red dress,
having the mundane smile on her face,
as if challenged by happiness for a race..

I am quite, as always sticking to my solitary confinement.
She makes me feel alive, just by her presence.

I have this intense feeling of just watching her move around.
Not going to her, not talking to her.
I just want to be the silent observer of this beauty.

A guy walks to her, I can see the glow on her face.
She likes him.
He takes her to dance, she is mellow.

There is a scar on her face.
And that scar is disappearing. She is making it go away.
She dances like an angel, mesmerizing everyone around.
And I am anything but sad, I can't understand this feeling.
I am watching her dance with someone else.

She have a scar on her face.

I am having a scar on my heart.

ग्लोबल ह्यापिनेस ईंडेक्स

" बारक्या, ते तेल बाटलीत काढून ठेव, उद्या लागेल", दिवसभर जीलेब्यांचे घन काढून थकलेला राक्या बोलला. रात्रीचा थंड वाऱ्यात त्याला आत्ताच पेंगायला होत होतं.
दिवसभराच्या वाहतुकीनंतर शांत झालेला रस्ता.
राक्याच्या गाडीच्या बाजूलाच पान टपरी, तिथे - लोक सिगारेटी ओढत बसलेले.
पान टपरीवाला थोडा रसिक पट्टीतला असावा, त्याच्या टपरीवर नुस्रत चे गाणे चालूए

वोह हटा रहे है पर्दाह, सर--बाम चुपके चुपके

एका उंची दुचाकीवरून एक मुलगा उतरतो, "एक माईल्ड भाऊ"
त्याचा फोन वाजतो.
"हं बोला सर"
इकडे राक्याची आवरा-आवर चालू आहे.
"बारक्या, उद्यासाठी मैदा आणायला सांगितला होता तुला, आणला ना?"
"अहो पण असा काय करता आपलं ३००० रुपये स्क्क़ेअर फूट ठरला होता ना…"
"हा बे, आणलाय तुझा मैदा… "
"हो पणआपलं ठरलं होतं नामग असं कसं तुम्ही … "

दिखाओ चलते चलते यूँ कदम कदम पे शोंखी,
कोई क़त्ल हो रहा है, सर--आम चुपके चुपके

"अहो मला काही माहित नाही, हे बघा मी आता हे वरचे पैसे कुठून द्यायचे तुम्हालाहलो? हलोssss?"
"बारक्या आज बाकी धंदा एकदम झकास झाला राव, अबे २००-३०० चा गल्ला जमला असेल आरामात!"
दुचाकीवाला माईल्ड पेटवतो
राक्या निघायच्या तयारीत
मागून एक भिकाऱ्यांचा घोळका येतोय

कभी शोखियाँ दिखाना कभी उन का मुस्कुराना

त्यात एक - वर्षांची मुलगी
माईल्ड ओढणाऱ्या दुचाकी वाल्या जवळ ती पैसे मागते, तो तिच्या कडे बघताच नकारार्थी हात करतो
तिला वाईट वाटत नाही, बहुदा तिचा आजचा कोटा पूर्ण झाला असावा
भिकारीण पुढे जाते

यह अदाएं कर डाले मेरा काम चुपके चुपके!

दुचाकी वाला तिच्याकडे पाहतोय, थोड्या तिरसट पनेच.… पण तिला आपण काही दिले नाही याचा थोडा पश्चाताप जाणवतोय
ती नेहमीच्या सहजतेने राक्या समोर हात धरतेराक्या हसून तिच्या हातावर मुद्दाम बाजूला काढून ठेवलेली जलेबीची पुडी ठेवतो
भिकारीण निघते, थोडं पुढे चालणाऱ्या आपल्या मोठ्या भावाला जलेबीची पुडी देतेदोघे आनंदाने खातात…!
तिकडे सातासमुद्रपार काही अर्थतज्ञ "ग्लोबल ह्यापिनेस ईंडेक्स" बद्दल चर्चा करत असतात… !
इकडे नुसरत आपली चीज संपवतो,

"ये जो हिचकियाँ मुसलसल मुझे रही है आलम,
कोई ले रहा है शायद ...कोई ले रहा है शायद
मेरा नाम चुपके चुपके !!"