तलावाच्या स्थिर पाण्यात एका वार्याच्या
झुळऊकेणे पडणार्या तरंगाच्याच इतकी सहज पडणारी,
ती तिच्या गालावरची खळ|ई..
मखमलिच्या कापडाला लाज वाटायला
लावणारी ती कांती
नाजुकतेची व्याख्या बदलायला
लावणारे ते ओठ
आणि पैलु लावलेल्या हिर्याइतकंच
रेखीव शरीर..
आपल्या प्रत्येक अदेतून नशेचे प्याले
पाजणारी ती,
नशेबाज असल्याचा दोष मला देते...!!
वेड्यांचा बाजार..
आणि या बाजारातील एक वेडा
मूठभर माती आणि छटाकभर रंगांनी
बनवलेल्या या वेड्याला ते देव म्हणतात !
या वेड्याला त्यांनी उंचावर बसवलंय,
आपल्यापासून वेगळं पाडलंय..
उंचावर बसून मग हा वेडा
भोवतालची गंमत पाहतो.
त्याला वंदन करायला आलेल्या
नारायणला नोकरी हवी आहे,
रम्याला रमी हवी आहे,
किशोरीला मूल आणि सायालीला चूल हवी आहे..
तथास्तु म्हणून तो विचार करतो,
देवपण नक्की कोणाला? मला की माझ्या वरदानाला?
इच्छा पूर्ण करतो तोपर्यंत मी बाप्पा,
आणि जेव्हा हे वरदान नाहीसं होईल तेव्हा?
स्वार्थाच्या तराजूत पुण्य ते तोलतात,
ज्यांच्या नितिमत्तेचि लक्तरे झालियेत..
आणि तरीही हा वेडा, समोर येणार्या
प्रत्येकाला तथास्तु म्हणतो..!
डोंबार्याने खेळ चालवलाय..
डम डम डमाक डम डम डमाक
आम्हाला शिकवलंय त्याने, नाचायला..
आम्ही नाचायला लागतो जेव्हा आवाज येतो,
डम डम डमाक डम डम डमाक
आम्हाला आमचे अधिकार नाहीत,
आम्ही तेच करतो जे लोकांना आवडंत
कारण तेव्हाच धन्याचं आणि आमचं पोट भरतं..
डम डम डमाक डम डम डमाक
का करतो आम्ही हे काम?
कारण आमच्या आई-बापानं हेच केलं..
आमची मुलं काय करणार?
हेच काम करणार..
युगांपासून डोळ्यांना बांधलेली पट्टी आम्हाला आवडते..!
डम डम डमाक डम डम डमाक....