Facebook Badge

Sunday, August 29, 2010

वेगळा तू...

हजारो एकर शेताखालील जमिनीच्या कोणत्यातरी एका भागात
एक ऊसाचे रोपटे जन्माला येते..
ते एकटे नसते, त्याच्या बरोबर लाखो रोपटे जन्म घेतात..
आणि मग सुरू होते स्पर्धा, कोण जगतो याची.
प्रत्येकाला वाढायचे असते, सूर्यप्रकाशासाठी, जागेसाठी..
..
पण त्या जागेपासून थोड्या अंतरावर, बांधावर जन्मलेले
एक रोपटे, लांबून त्यांची गंमत पाहत असते.
ते त्यांच्या स्पर्धेत सहभागी होत नाही,
त्याला त्याची गरजच वाटत नाही.
ते फक्त त्यांना बघते उंच वाढतांना.
ते स्वत:लाच विचारते,
काय गरज असते अशी स्पर्धा करण्याची?
का इतरांपेक्षा मोठे वाढायचे?
..
इतर रोपटाना नियमीत पाणी मिळत असे.
हे रोपटे मात्र कधीकाळी मिळणारे
पाण्याचे थेंब शोषत असे..
..
आणि एक दिवस कापणी सुरू झाली,
सर्व रोपटाना कापले गेले.
जे उंच होते त्याना आनंदाने, इतरांना रागाने..
ते रोपटे स्वत:शीच हसले, आणि त्याच्यावर घाव बसला..
तेही रोपटे मेले, ..पण हसत.....:)


No comments:

Post a Comment