Facebook Badge

Monday, October 25, 2010

मी..

मी असाच भरकटलेला असतो
जगाच्या गर्दीत हरवलेला असतो

प्रत्येक जन येथे आपापले फासे टाकतो
एका डावाचा राजा दुसर्या डावाचा प्यादा ठरतो
पटावरचा डाव जसा क्षणात उधळता येतो
जीवनपटही येथे तसाच उध्वस्थ होतो

कधीतरी मग ठरवतो, मी मनाचे सारे लगाम खेचतो
सात जन्माचे पुण्या मग पणाला लावतो...
...माझा पतंग दूर आकाशात जातो
पण..त्याला नियंत्रित करायला मी नसतो..कारण..

मी असाच भरकटलेला असतो
जगाच्या गर्दीत हरवलेला असतो.....

No comments:

Post a Comment